नवी दिल्ली – इंडियन बॅंक असोसिएशन व युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन यांच्यादरम्यान झालेल्या तीन वर्षांच्या चर्चेनंतर बॅंक कर्मचाऱ्यांना 15 टक्के पगारवाढ देण्याच्या निर्णयावर मतैक्य झाले.
बॅंकांवर 7,900 कोटी रुपयांचा बोजा पडेल. पगारवाढ 2017 पासून लागू होणार असून साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होईल. सरकारी बॅंकांतील कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता आधारित उत्तेजन मिळेल. इतर बॅंकांना हा पर्याय स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. देशातील 37 बॅंकांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. नव्या पेन्शन योजनेत बॅंकांचे योगदान सध्याच्या 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात आले.