मुंबई – साऊथ सिनेसृष्टीतील एक उत्तम आणि अप्रतिम कलाकार जो कोणत्याही अर्थाने बॉलिवूड स्टार्सला मागे टाकतो. अल्लू अर्जुन बद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आर्या,बुमरेलु असे एकापेक्षा एक सुपर हिट देऊन अल्लू सगळ्यांच्या मनात घर केले होते. त्यानंतर पुष्पाने अल्लूला देशाबाहेर देखील प्रसिद्ध केले. अल्लू अर्जुन क्लासिक लक्झरी लाईफ जगतो. आज आपण त्याच्या जीवन शैलीविषयी जाणून घेणार आहोत.
अल्लू अर्जुनची गणना साऊथ सिनेसृष्टीतील श्रीमंत कलाकारांमध्ये केली जाते. ‘पुष्पा’ स्टार अभिनेता सध्या एका चित्रपटासाठी 125 कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे. अल्लू अर्जुनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर, त्याची एकूण संपत्ती 350 कोटी रुपये आहे, जी तो चित्रपट आणि इतर अनेक गोष्टींमधून कमावतो. यामध्ये ब्रँड एंडोर्समेंटचा देखील समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने त्याच्या सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा: द राइज’साठी 32 कोटी रुपये घेतले होते. पण आता अल्लू अर्जुनने याच चित्रपटाच्या सिक्वेल ‘पुष्पा: द रुल’साठी 100 कोटी रुपये घेतले असल्याची चर्चा आहे. चित्रपटांसोबतच अल्लू अर्जुन अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम करतो, ज्यातून तो सुमारे चार कोटी रुपये कमावतो. चित्रपट आणि जाहिरातीमध्ये काम करण्यासोबतच अल्लू अर्जुनने हैदराबादमधील आरोग्य सेवा केंद्रातही गुंतवणूक केली आहे.
अल्लूचे घर हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये आहे. ज्युबली हिल्स हे हैदराबादचे सर्वात पॉश क्षेत्र मानले जाते. अल्लू अर्जुनचे घर आतून खूप सुंदर आहे.आठ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या आलिशान घरात खासगी पूलही आहे. त्याच्या घराची किंमत 100 कोटी आहे. हैदराबादमधील या घराशिवाय अल्लू अर्जुनकडे मुंबईत टू बीएचके अपार्टमेंटही आहे, जो त्याने २०१५ मध्ये खरेदी केला होता.
अल्लू अर्जुनला घरासोबतच महागड्या कारचाही शौक आहे. त्याच्याकडे उत्तम कारचा संग्रह आहे, तो त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये ठेवतो. अल्लू अर्जुनकडे रेंज रोव्हर वोग, हमर H2, व्होल्वो XC90 T8 एक्सलन्स, मर्सिडीज GLE 350d, Jaguar XJ L आणि BMW X6 M Sport यांचा समावेश असलेली विविध वाहने आहेत. या सर्वांची किंमत लाखोंमध्ये आहे. इतकेच नाही तर अल्लूकडे स्वतःचे खाजगी जेट तसेच ७ कोटींची पर्सनल व्हॅनिटी व्हॅन ‘द फाल्कन’ देखील आहे.