मंचर, (प्रतिनिधी)- खडकी (ता. आंबेगाव) येथील वाबळेमळा येथील कमलजादेवी सभा मंडपासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून सभामंडपाच्या बांधकामासाठी दहा लाख रुपये निधी देण्यात आला.
त्यानिमित्ताने सभामंडप बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी खडकी गावचे सरपंच नारायण बांगर, दादाभाऊ पोखरकर, चेअरमन बाळासाहेब पोखरकर, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दत्ताशेठ हगवणे, माजी सरपंच कृष्णा भोर,
तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रेय भोर, उपाध्यक्ष नवनाथ वाबळे, दीपक दादा बांगर राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष, दत्तात्रय बांगर ग्रामपंचायत सदस्य, वसंत पाटील व्हाइस चेअरमन, राजू पोखरकर युवा नेते, रोहिदास वाबळे, नवनाथ वाबळे, बाळशिराम वाबळे प्रगतिशील शेतकरी, ग्रामस्थ उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.