आरटीजीएस, एनईएफटी सेवा मोफत उपलब्ध
नारायणगाव- येथील अग्रगण्य असलेल्या लाला अर्बन को-ऑप. बॅंकेला सहामाही सप्टेंबर- 2019 अखेर रू. 1 कोटी 22 लाख नफा झाला असून बॅंकेने मार्च 2020 पर्यंत अनेक आकर्षक कर्ज योजना सुरू केल्या आहेत. ग्राहकांसाठी दसरा दिवाळी निमित्त बॅंकेने 210 दिवसांकरीता 8.10 टक्के व्याजदराने विशेष ठेव योजना सुरू केली आहे. तसेच आरटीजीएस, एनईएफटी या सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष ऍड. एन. एम. काळे, उपाध्यक्ष नितीन लोणारी व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावळकर यांनी दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना मोबाईल बॅंकींग सुविधा अल्पावधीत उपलब्ध करून देण्याचा बॅंकेचा मानस आहे. दसरा दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी वाहन कर्ज, गृहसजावट, घर खरेदी कर्जाच्या योजना सुरू केल्या असून कमीत कमी मार्जिन तसेच इतर छुपे चार्जेस न आकारता सर्व सामान्य कर्जदारास सहज सुलभतेने कर्ज लवकरात लवकर मिळेल अशी कार्यप्रणाली अंमलात आणली आहे. तसेच या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळील शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.त्याचप्रमाणे बॅंकेचे सध्या 4 शाखामध्ये ए.टी.एम. सुविधा असुन त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. लवकरच भोसरी शाखेमध्ये ए.टी.एम.सुविधा सुरू करण्यात येत आहे. तसेच या वर्षाअखेर बॅंकेचा व्यवसाय 600 कोटीपर्यंत व एकूण नफा 6 कोटीपर्यंत करण्याचे उद्दिष्ठ बॅंकेने ठेवले आहे.