मालकाचा विश्वास संपादन करुन सहा लाखाची चोरी करणारा जेरबंद
पुणे,दि.24- मालकाचा विश्वास संपादन करुन लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी करणाऱ्यास हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ळक 270 ग्रॅम सोन्याच्या कड्यासह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
किरण अशोक गायकवाड(22,रा.कानिफनाथ सोसायटी, मांजरी बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी हडपसर परिसरातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. त्यांनी गादीखाली ठेवलेले 30 तोळे सोन्याचे कडे चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यानूसार तपास करुन तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी अशोकला ताब्यात घेऊन तपास केला. त्याने गुन्हयाची कबुली दिल्यावर चोरीचा ऐवज हस्तगत करुन त्याला अटक करण्यात आली. तो फिर्यादीच्या घरी मागील तीन वर्षापासून कामाला होता. फिर्यादी झोपताना नेहमी हातातील सोन्याचे कडे गादीखाली ठेवत असल्याची त्याला माहिती होती. त्याने पाळत ठेऊन ही चोरी केली होती. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस कर्मचारी संपत औचरे, राजेश नवले, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, गणेश दळवी, गोविंद चिवळे, नितीन मुंढे, शाहिद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, विजय पवार यांच्या पथकाने केला.