शिंदे वासुली – करोना व्हायरसचा संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी पुणे व पिंपरी शहरासारखी ग्रामीण भागातील नागरिक सुरक्षित राहण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवल्या जात आहेत. भांबोली (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीने सरपंच सागर निखाडे यांच्या प्रयत्नातून एपीएम टर्मिनल्स प्रा. लि. भांबोली या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण गावात सोडीयम हायपो ड्रोक्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करुन प्रत्येक कुटुंबाला मास्क, सॅनिटायझर व साबणाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सागर निखाडे, ग्रामपंचायत सदस्य भरत लांडगे, दत्तात्रय राऊत, अर्जुन राऊत, कंपनीचे सीएसआर अधिकारी बापू कदम, सोमय्या रुद्रा व कर्मचारी उपस्थित होते. शासनाने करोना आपत्कालीन परिस्थितीत उद्योजक व कारखानदारांना कार्यक्षेत्र व राज्यातील नागरिकांना आरोग्य व अन्य जीवनावश्यक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनाच्या धर्तीवर चाकण एमआयडीसी टप्पा दोन मध्ये अनेक कंपन्या स्वेच्छेने नागरिकांसाठी वैयक्तिक सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत.