जुन्नर- कोल्हापूर व सांगली जिल्ह्यावर आसमानी संकट कोसळले असून जुन्नर तालुक्यातून अनेक गावांमधून मदतीच्या गाड्या भरून रवाना झाल्या आहेत. यामध्ये जुन्नर पोलीस खात्यानेही आपली सामाजिक बंधिकली जपत रुग्णवाहिकेसह खाद्य पदार्थ व पाणी पाठविले आहे. याप्रसंगी पोलीस पाटील संघटनेने आर्थिक मदत देऊ केली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलीस निरीक्षक मुकूंद पालवे, मिलिंद साबळे, पोलीस पाटील अमोल थोरवे, मंगेश डोके, कविता बिडवई, पोलीस हवालदार बाळासाहेब पवार, निलेश कोळसे, ज्ञानेश्वर तांबडे, राहूल नाईक, रवींद्र सरजीने, मोहन चकवे, डिगु कबाडी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.