आग्रा – बकरी ईदनिमित्त दि. 12 रोजी (सोमवारी) जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ‘ताजमहाला’त तीन तासांसाठी नागरिकांना मोफत प्रवेश राहणार आहे. सकाळी 7 ते 10 वाजेच्या कालावधीत मोफत प्रवेश असेल. उद्या देशभरात साजऱ्या होत असलेल्या बकरी ईदनिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.
याठिकाणी स्थानिक मुस्लिम बांधव ताजमहालाच्या आतमध्ये असणाऱ्या मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असतात. त्यामुळे उद्या ताजमहालात नमाज पढण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, या तीन तासांमध्ये लोकांना ताजमहालात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची कडक तपासणी केली जाईल. तसेच त्यांना आतमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि खाण्याच्या वस्तू नेण्यास सक्त मनाई असेल.
दरम्यान, ताजमहालात प्रवेश करण्यासाठी एरवी 50 रुपयांचे शुल्क आकारले जाते. तर परदेशी पर्यटकांकडून 1100 रुपये शुक्ल आकारले जाते. उद्या बकरीद निमित्त तीन तासांसाठी नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.