पोर्ट ऑफ स्पेन – भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसरा सामना आज होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताला मधल्या फळीतील खेळाडूंच्या कामगिरीची समस्येने ग्रासले होते. वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात या समस्येवर भारत कशी मात करतो हीच उत्सुकता निर्माण झाली आहे. कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या विंडीजच्या संघात स्थान न मिळालेला ख्रिस गेलवर निवृत्त होण्यापूर्वी शानदार कामगिरी करण्याचे दडपण राहणार आहे.
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला असून भारतीय कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#TeamIndia Captain @imVkohli calls it right at the toss. Elects to bat first against West Indies at Queen’s Park Oval. pic.twitter.com/PSlAXEEvIO
— BCCI (@BCCI) August 11, 2019
भारतीय संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद.
वेस्टइंडिज संघ : जेसन होल्डर, क्रिस गेल, एविन लुइस, शाई होप, निकोलस पूरन, शिमरोन हेटमायर, रोस्टन चेज, कार्लोस ब्रैथवेट, केमार रोच शेल्डोन कॉट्रेल और ओशाने थॉमस.