नवी दिल्ली – करोनाव्हायरस संसर्गामुळे होणाऱ्या तीव्र श्वसन त्रासाच्या सिंड्रोम (एआरडीएस) बरे करण्याची क्षमता असलेल्या रासायनिक रेणूंचा एक समूह सापडला आहे, असा दावा नोएडास्थित शिव नादर विद्यापीठाच्या संशोधकांनी मंगळवारी केला आहे.
रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक सुभ्रभत सेन यांच्या नेतृत्वात संशोधकांच्या पथकाची अशी अपेक्षा आहे की, या वर्षाच्या अखेरीस पूर्व-वैद्यकीय अभ्यास पूर्ण होईल आणि त्यानंतर हा मूलद्रव्यांचा संच मानवी चाचण्यांसाठी वापरता येऊ शकेल. हे नवीन रासायनिक घटक (एनसीई) कोविड -19 किंवा सार्सद्वारे प्रेरित तीव्र श्वसनाचे विकार (सिंड्रोम) बरे करण्याची क्षमता बाळगून आहेत.
नवीन रासायनिक संशोधनाचे संरक्षण करण्यासाठी या संशोधकांनी भारतात तात्पुरते पेटंट दाखल केले आहे आणि शोधातील अभिनव रेणू-अणूच्या चाचण्या विविध प्राण्यांवर कशा गेह्ता येतील, याविषयी अभ्यास सुरु आहे. शिवाय अशी रासायनिक मूलद्रव्ये वापरुन केलेली लस किती कार्यक्षम असेल, तेही पाहिले जाणार आहे.
ही थेरपी केवळ कोविड 19 च्या एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांवर होण्यापासून आक्रमणापासून रोखू शकेल्च, शिवाय विषाणूमुळे आधीच झालेल्या फुफ्फुसांच्या जखमांवरही लक्ष ठेवेल. अनेकदा अशा परिस्थितीत व्हेंटिलेटर एकतर प्रभावी ठरत नाहीत किंवा ते उपलब्धच नसतात. त्यामुळे अशी रासायनिक मूलद्रव्ये वापरुन केलेली लस सर्वात प्रभावी ठरू शकण्याचा दावा या संशोधकांच्या गटाने केला आहे.