- आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रक्षक क्लिनिकचे उद्घाटन
तळेगाव स्टेशन – येथील समर्थ हॉस्पिटल, शांताई सिटी सेंटरमध्ये रक्षक क्लिनिकचे सोमवारी (दि. 27) आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संजय बाविस्कर, निलेश गराडे, सुनील गायकवाड तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेलचे डॉ. चौधरी, डॉ. येळवंडे, डॉ. सांडभोर, डॉ. सुदाम खेडकर, डॉ. संतोष जमदाडे, डॉ. गिरीश राठोड उपस्थित होते.
या वेळी मावळ तालुक्यातील डॉक्टरांना फेसशिल्ड तसेच फेसमास्कचे वाटप करण्यात आले. करोनाबद्दल योग्य मागदर्शन या क्लिनिकच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे, तरी गरजू व संशयित रुग्णांनी तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन समर्थ हॉस्पिटलचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सुदाम खेडकर (एम. डी. मेडिसिन) यांनी केले आहे. नागरिकांनी गोंधळून न जाता करोनाविषयक खात्रीपूर्वक मार्गदर्शनासाठी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी “रक्षक क्लिनिक’ (02114 225999) येथे संपर्क साधावा.