Entertainment । अभिनेत्री नोरा फतेहीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया नेहमीच चर्चेत असतात. पापाराझी नेहमीच नोरा फतेही लुकचे फोटो सोशलवर सेंड करत असतात. असे असले तरी नोराने पापाराझीवर नाराजी व्यक्त केली आहे. नोराने एका मुलाखतीत सांगितले आहे की,’पापाराझी माझ्या शरीराचे अवयव झूम करण्याचा प्रयत्न करतात.’ असा आरोपही तिने केला आहे.
नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात मृणाल ठाकूरने पापाराझींना बॅक पोज देण्यास नकार दिला होता. पलक तिवारीनेही पापाराझीना फटकारले होते. अशात नोरा फतेही पापाराझीवर नाराजी व्यक्त करत सांगितले की,’शरीराच्या इतर अवयवांवर अनावश्यकपणे झूम इन करून ते व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात असतात.’ हे पूर्णपणे चुकीचे आहे.
नोरा म्हणाली, (पापाराझी) ते अनावश्यकपणे शरीराच्या इतर भागांवर झूम वाढवतात. कधीकधी मला वाटते की झूम इन करण्यासारखे काहीही नाही म्हणून ते कशावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात?’ असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केली आहे, नोरा पुढे म्हणाली,’सुदैवाने माझे शरीर चांगले आहे आणि मला माझ्या संपत्तीचा अभिमान आहे. मला त्याची लाज वाटत नाही. नोरा फतेहीच्या आगामी चित्रपटांमध्ये साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल 5’ आणि ‘100 पर्सेंट’ यांचा समावेश आहे.’
हे वाचलं का ? श्रद्धा कपूर शेअर केले डोंगर दऱ्यातील ‘फोटो’