आबूधाबी – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने यशाच्या वाटेवरचा प्रवास सुरू केल्याचे रविवारी झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिसून आले होते. आता आज त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत असून त्यात पुन्हा अपेक्षेप्रमाणे चेन्नई विजय मिळवणार का कोलकाताला धक्का देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
चेन्नई विरूध्द पंजाब यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार दिनेश कार्तिक याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#KKR have won the toss and they will bat first against #CSK.#Dream11IPL pic.twitter.com/7iDHNesmDv
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2020
दरम्यान, दोन्ही संघातील आक्रमक फलंदाजांची नावे पाहिली तर या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे. खासकरून चेन्नईचा वॉटसन व कोलकाताचा रसेल यांच्यातच खरी जुगलबंदी रंगणार आहे.