श्रीनाथ साखर कारखान्याकडून गावविकासासाठी मदत

तळेगाव ढमढेरे-येथील गावातून सुमारे दहा हजार टन ऊस गाळपासाठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठाण यांच्याकडे पाठवण्यात आल्यामुळे गावाच्या विकासासाठी 25 हजारांचा धनादेश कारखान्याच्या वतीने देण्यात आला.

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने ग्राम गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित्‌ होते. या ग्रामगौरव पुरस्काराचा धनादेश स्वीकारण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, संचालक अनिल भुजबळ, तळेगाव ढमढेरेचे उपसरपंच विजय ढमढेरे, ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश तोडकर, महेंद्र पिंगळे, राजेंद्र केदारी, अण्णा तोडकर आदी गावकरी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.