शिवाजीराव भोसले बॅंकेत रोकडचा खडखडाट

यवत येथे ग्राहकांच्या रांगा : पैसे मिळत नसल्याने खातेदार चिंतेत

यवत -दौंड तालुक्‍यातील यवत येथे असलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत पैसे नसल्याने खातेदार ग्राहकांना आठ दिवसांपासून पैसे मिळत नसून खातेदार ग्राहक चिंतेत पडला आहे. बॅंकेत पैशांचा खडखडाट झाल्याने आपले पैसे तर बुडणार नाहीत ना या भीतीने ग्राहक आपल्या ठेवीचे पैसे काढण्यासाठी बॅंकेसमोर बसून गर्दी करीत असल्याने खातेदारांना पुन्हा नोटाबंदीची आठवण झाली आहे.

यवत येथे गेली 20 वर्षांपूर्वी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेची शाखा झाली आहे. या बॅंकेत मोठ्या संख्येने खातेदार ग्राहकांच्या ठेवी असून दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून या बॅंकेत पैसे नसल्याचे कारण सांगून ग्राहकांना पैसे मिळत नव्हते. आपले बॅंकेत ठेवलेले पैसे तर बुडणार नाहीत ना या भीतीने ग्राहकांनी आपल्या ठेवीचे पैसे काढण्यासाठी बॅंकेत गर्दी करीत आहेत. तर ग्राहक बॅंकेसमोर दिवस-दिवस पैशांसाठी बसत आहेत. लोकसभा निवडणूक असल्याने पैसे मिळत नसल्याचे कारण बॅंक प्रशासनाने दिले आहे. सोमवार (दि. 22) पासून प्रत्येक ग्राहकाला बॅंक फक्‍त 2 हजार रुपये देत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

  • मागील आठवड्यात बॅंक अडचणीत असल्याबाबतची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बॅंकेत एकदम खातेदार ग्राहकांची पैसे काढण्याची मागणी वाढली. निवडणुकीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड काढता येत नाही. गुरुवारनंतर परिस्थिती सुरळीत होईल.
    – अनिल भोसले, अध्यक्ष, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.