लोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवल्याचे स्पष्टीकरण

लोणंद, दि. 23 (प्रतिनिधी) – गुरुवारी भरणारा लोणंदचा आठवडी बाजार निवडणूक निकालामुळे होणार नाही, अशा प्रकारची अफवा सध्या पसरविली जात आहे. मात्र लोणंदचा आठवडी बाजार हा नेहमीप्रमाणे होणार आहे, असे स्पष्टीकरण नगरपंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार सतिमीच्या आवारातील व्यवहार फक्त बंद राहणार असल्याचे नगरपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा निकाला हा गुरुवार, 24 रोजी लागणार आहे. विशेष म्हणजे गुरुवार हा लोणंदचा आठवडी बाजाराचा दिवस आहे आणि निवडणुकीच्या निकालामुळे बाजार होणार नाही, अशी अफवा सध्या सोशल मीडियावर पसरविली जात आहे. त्यामुळे लोणंदसह परिसरातील शेतकरी व व्यापारी संभ्रमित झाले आहेत. मात्र अशा प्रकारचे कोणतेही पत्रक नगरपंचायतीच्यावतीने काढलेले नसून नेहमीप्रमाणे बाजार होणार असल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे. लोणंद ही मोठी व्यापारी बाजारपेठ असून लोणंदला जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर व्यापारी तसेच शेतकरी आपला शेतमाल घेऊन बाजारात येत असतात. त्यावर अशा अफवेचा परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही असे मत शेतकरी तसेच लोणंदकर नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.