डी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर 

नवी दिल्ली –  मनीलॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने अखेर आज जामीन मंजूर केला आहे. शिवकुमार यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अवैध संपत्ती प्रकरणी ३ सप्टेंबरला अटक केली होती. यानंतर आज २५ हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. दरम्यान, सध्या शिवकुमार न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, आज सकाळीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षाचे कर्नाटकातील नेते आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या अंबिका सोनी उपस्थित होत्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.