लिफ्ट अपघातातून बचावले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री

15 जणांचा भार पेलणाऱ्या लिफ्टमध्ये 20 जण?

इंदुर – एका खासगी हॉस्पीटलमध्ये रविवारी लिफ्ट कोसळून मोठा अपघात झाला. या लिफ्टमध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ होते. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. अपघात लिफ्ट ओव्हरलोड झाल्यामुळे घडला. कमलनाथ DNS हॉस्पीटलमध्ये माजी मंत्री रामेश्वर पटेल यांना भेटण्यासाठी गेले होते.

लिफ्ट कोसळल्यामुळे कमलनाथ यांचे तब्येत अचानक खराब झाली. यानंतर डॉक्टरांनी घाबरलेल्या कमलनाथ यांचे ब्लड प्रेशर चेक केले. सध्या डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. अपघातावेळी कमलनाथ यांच्यासोबत माजी मंत्री जीतू पटवारी आणि सज्जन सिंह वर्मादेखील होते. या अपघातानंतर हॉस्पीटलमध्ये एकच गोंधळ झाला. यानंतर लिफ्टच्या इंजिनिअरला बोलवण्यात आले. मोठ्या प्रयत्नानंतर सर्व नेत्यांना बाहेर काढण्यात आले. यादरम्यान घाबरलेल्या कमलनाथ यांची तब्येत बिघडली. हॉस्पीटलमध्ये त्यांचे चेकअप केल्यानंतर रवाना करण्यात आले.

इंदुरला सुरू असलेल्या संमेलनात राज्यातील अनेक नेते आले. यावेळी माजी मंत्री रामेश्वर पटेल इंदुरच्या हॉस्पीटलमध्ये भरती असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनाच भेटण्यासाठी माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा आणि जीतू पटवारी अनेक नेत्यांसह रविवारी दुपारी 4 वाजता DNS हॉस्पीटलमध्ये गेले होते. हॉस्पीटलच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाटी नेते लिफ्टमध्ये गेल, पण 15 जणांचा भार पेलणाऱ्या लिफ्टमध्ये 20 जण गेले आणि ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट खाली कोसळली.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कलेक्टर मनीष सिंह यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.