नवीन व्हिजन घेऊन शहराचा विकास व्हावा : चंद्रकांत पाटील

विविध विकासकामांचे उद्‌घाटन

कोथरूड – विकासासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. रस्ता झाला आणि विषय संपला असे होऊ नये. विकासकामे झाल्यावर ते व्यवस्थित राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सतर्क रहावे. रस्ते, पाणी, वीज या सुविधा देणे महापालिकेची जबाबदारी आहेच, त्नवीन व्हिजन घेऊन शहराचा विकास व्हावा, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पावनखिंडीतील (डुक्कर खिंड) वंडर फ्युचर सोसायटी ते महात्मा सोसायटी हा महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे व तेथील हायमास्ट आणि लाइटपोलचे उद्‌घाटन चंद्रकांत पाटील आणि आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या विकासनिधीतून हे काम करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, गणेश वरपे, वैभव मुरकुटे, विलास मोहोळ, सागर कडु, धनंजय दगडे पाटील, योगेश मोकाटे, राजेश कुलकर्णी, कैलास मोहोळ, शरण कोळी, अमोल दळवी, मेहबूब तांबोळी यासह नागरिक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, महामार्गाला लागून असलेला रस्ता खुला व्हावा यासाठी अनेकांनी मागणी केली. तर अनेकांनी विरोधही दर्शविला. मात्र, विकासासाठी थोडा त्रास होणारच. वाहने वाढणार नाहीत यावर मार्ग काढू असा विश्‍वास दिल्यामुळे हे विकासकाम मार्गी लागले. डोंगराची दरड कोसळणार नाही, यासाठी लोखंडी जाळी लावावी, असा सूचना पाटील यांनी दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.