अकलूज- रक्तदानासारख्या पवित्र कार्यामुळे अनेकांचे जीव वाचत असतात. त्यासाठी युवापिढीने रक्तदान करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले. आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोरचे संस्थापक सद्गुरू श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज पोलीस ठाणे व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. ते म्हणाले की, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जागतिक स्तरावर अनेक सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबविले जातात. त्यापैकी रक्तदान शिबिरासारखा उपक्रम कौतुकास्पद आहे.
यावेळी पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पोलीस निरीक्षक विश्वासराव साळोखे, स्वप्नील वाघमारे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे,डॉ संतोष दोशी, डॉ. संतोष खडतरे, डॉ. बाहुबली दोशी, डॉ. अजित गांधी, डॉ. राजेश चंकेश्वरा, सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड बॅंक अकलूज यांचे सहकार्य लाभले. प्रा. धनंजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. माऊली मुंडफणे यांनी आभार मानले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबीरामध्ये 107 साधकांनी सहभाग घेतला. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड बॅंकचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगशिक्षक हरीभाऊ माने, गोरख डांगे, राजीव बनकर, उदय साळुंखे, नागेश कोरे, सत्यवान पराडे, डॉ. अभिमन्यू चव्हाण, पोलीस कर्मचारी विनोद चौगुले, विलास वाघमोडे, बबलू गाडे यांनी सहकार्य केले.