कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर येथे आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 7 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. या मोहिमेचा पंचेचाळीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, स्वरा फौंडेशन प्रमोद माजगावकर व कार्यकर्ते, स्वच्छता दूत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एन.एस.एसचे विद्यार्थी, कोल्हापूर फ्लोगर्स ग्रूपचे, अमित साखरे युवामंच ताराराणी हायस्कूल राजारामपुरी संस्थेचे कार्यकर्ते व अग्निशमन विभाग कडील जवान व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. ही मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी तपोवन ग्राऊंड येथे दि. 8 मार्च 2020 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्लॅस्टिक व थर्माकॉल मुक्तीबाबत जनजागृती करण्यात येत होती.
या मोहिमेत तपोवन ग्राऊड, गांधी मैदान, पंचगंगा नदी घाट, रियालन्स मॉल संपूर्ण परिसर, जयंती नदी पंपिंग स्टेशन, हुतात्मा पार्क तसेच कमला कॉलेज, उषाराजे हायस्कूल ग्राउंडची सफाई, टाकाळा येथील चॅनल सफाई, जयंती नदी संप व पंप हौस बंधारा येथील सांडपाण्यावर तरंगणारा प्लॅस्टिक तीन डंपर काढण्यात आला. ही मोहिम 4 जेसीबी, 5 डंपर, 6 आरसी गाड्या व महापालिकेच्या 150 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबविण्यात आली.
यावेळी उप आयुक्त निखील मोरे, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, विवेकानंद कॉलेज एन.एस.एसचे विद्यार्थी, सर्व आरोग्य निरीक्षक, कर्मचारी व नागरिक यांनी सहभाग दविला.