भोर शहरात पोलिसांनी केले सशस्त्र संचलन

भोर- लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भोर आणि राजगड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीसांनी भोर शहरात पोलीस दलाच्या कार्यतत्परतेचे दर्शन घडवणारे मॉकड्रील आणि सशस्त्र संचलन केले.

भोर पोलीस स्टेशनच्या परेड मैदानावर सशस्त्र मॉकड्रिल करण्यात आले. भोर पोलीस स्टेशन ते चौपाटी शिवाजी पुतळा मार्गे मंगळवार पेठ ते एस स्टॅंडपर्यंत लाठी, काठी, हेल्मेट तसेच अद्यावत हत्यारांसह संचलन करुन लोकसभेच्या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे जनमाणसांना दर्शन घडवले.

भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजू मोरे, उपपोलीस निरीक्षक नंदकुमार तडाखे, राजेंद्र पवार, पोलीस जमादार नांदे तसेच राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह सुमारे 70 ते 80 पोलीस कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, घडलाच तर त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी अधुनिक शस्त्रांचा वापर कसा करायचा आणि जमावावर कसे नियंत्रण ठेवायचे, यासाठी मॉकड्रिल आणि सशस्त्र संचलन करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.