निमसाखर येथे मशीन पडले बंद

निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या निमसाखर गावठाण, लवटेवस्ती व कारंडेवस्ती या शाळांमध्ये मतदान निवडणूक प्रक्रिया पार पडली. येथे काही मतदान केंद्रांवर विस्कळीतपणा जाणवला.

कारंडेवस्ती येथील मतदान केंद्र क्रमांक 275 वरील मतदान मशीन सकाळी काही वेळ बंद पडले होते. त्यामुळे काही वेळ मतदान प्रक्रिया बंद ठेवावी लागली. दुसरे मशीन बसविण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर, लवटेवस्ती मतदान केंद्रावर विस्कळीतपणा जाणवला. त्याठिकाणी महिला आणी पुरुष एकाच रांगेत अढळले. वास्तवीक महिला आणी पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा असणे जरुरी आहे, याच बरोबर येथील केंद्रावरील वर्गापर्यंत रांगा वाढल्याने विस्कळीतपणाही वाढत गेला. निमसाखरमध्ये एकूण 4814 एवढे मतदान असुन संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत 2409 एवढे म्हणजे सुमारे 50 टक्के एवढे मतदान झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.