कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांना वाढती मागणी

मुंबई – आगामी काळात आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमता, सायबर सिक्‍युरिटी आणि प्रोग्रेसिव्ह ऍप्ससारख्या तंत्रज्ञानामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे शाईन डॉटकॉम या ऑनलाइन जॉब पोर्टलने हायरिंग ट्रेंड संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचे झाल्यास आयटी व्यावसायिकांना आपली कौशल्ये विकसित करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बीपीओ/केपीओ क्षेत्रातही तंत्रज्ञानाच्या व्यापक विकासामुळे रोजगारांच्या संधी वाढल्या आहेत आणि हा कल 2019 मध्येदेखील कायम राहणार आहे. अपेक्षेनुसार, बंगळूर, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई सारख्या मुख्य मेट्रो शहरांनी मक्तेदारी कायम ठेवली आहे. तथापि हैदराबाद, पुणे, कोलकता आणि अहमदाबाद सारख्या उदयोन्मुख शहरांनी सुद्धा हायरिंगच्या बाबतीत 2018 मध्ये चांगली कामगिरी करून प्रादेशिक जॉब हब असल्याचा दावा केला आहे.

गेल्या वर्षात, आयटी क्षेत्रातील वाढीच्या बळावर हैदराबाद हायरिंगमध्ये 5 अग्रेसर शहरांच्या यादीत सामील झाले आहे. शाईन डॉटकॉमच्या अंदाजानुसार, टियर 2 शहरातील वृद्धीचे श्रेय त्या-त्या भौगोलिक क्षेत्रांमधील एफएमसीजी/ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, फार्मास्युटिकल्स व आरोग्यसेवा आणि ऊर्जा व नूतनीकरण या क्षेत्रांच्या वाढीस आहे.

याशिवाय भारतात अनेक उत्पादन प्रकल्प उभारले जात असल्याने जिथे हे उत्पादन प्रकल्प आहेत, त्या टियर 2 आणि 3 शहरांमध्ये रोजगारनिर्मिती होईल. फिनटेक फर्म्स, मोबाइल वॉलेट्‌स आणि अनेक पेमेंट ऍप्समुळे बीएफएसआय क्षेत्राची स्थिर वृद्धी झाली आहे ज्यामुळे 2019 मध्येसुद्धा रोजगार निर्मितीच्या मुख्य उद्योगांत त्याचे स्थान अढळ राहील. 2019 मध्ये हायरिंग मध्ये वृद्धी दर्शवणा-या उदयोन्मुख उद्योगांमध्ये शिक्षण आणि आरोग्यसेवा समाविष्ट आहेत. या दोन क्षेत्रांमध्ये 2018 मध्ये अनेक तंत्रज्ञानातील स्टार्टअप्स सुरू झाले आहेत आणि 2019 मध्ये सुद्धा या क्षेत्रात वृद्धी आणि रोजगारनिर्मिती होईल.

अभियांत्रिकी आणि बांधकाम यासारख्या पूर्वी सुस्त असणाऱ्या उद्योगांमध्ये हायरिंगमध्ये वाढ दिसून आली आणि 2019च्या अव्वल 10 च्या सूचीमध्ये त्यांचा समावेश झाला. अहवालानुसार टियर 2 क्षेत्रातील अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात हायरिंगमधील झालेली वृद्धी पायाभूत सुविधांच्या प्रगतीमुळे असू शकते. शाईन डॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी झैरस मास्टर म्हणाले, सर्व उद्योगांमध्ये तंत्रज्ञानवर लक्ष केन्द्रित केल्यामुळे मागील वर्षी हायरिंग डोमेनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.