दिडशे फुट दरीत कार कोसळली ;दोन डॉक्‍टर जखमी

 

पुणे,दि.20- कात्रज जांभुळवाडी दरीपुलावरुन बलेनो कार 150 फुट दरीत कोसळली. बंगळुरू महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. या कारमध्ये भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधील दोन डॉक्‍टर होते. हे दोन्ही डॉक्‍टर जखमी झाल्यावर स्वत:हून वाहन गाठत रुग्णालयात दाखल झाले .
कात्रज जांभुळवाडी दरीपुलावरुन बलेनो कार भरधाव वेगात बंगळुरूकडून पुण्याच्या दिशेने येत होती. ही कार जांभुळवाडी दरीपुलावर बोगद्यातून बाहेर येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकली. यामध्ये कारमधील दोघेही कारसह दरीमध्ये कोसळले. ही दरी तब्बल दिडशे फुट खोल आहे. कारमधील दोघेही जखमी अवस्थेत वाहन पकडून भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान नागरिकांनी अग्निशमनदल आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांना गाडी चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत आढळली. मात्र गाडीमध्ये तसेच आजूबाजूला कोणीही जखमी अवस्थेत आढळले नाही. दरम्यान गाडीतील दोघेही भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल झाले आहेत. हे दोघेही भारती विद्यापीठमधील डॉक्‍टर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.