तरीही टिक टॉक गुंतवणूक करणार

नवी दिल्ली -भारत सरकारने टिक टॉक या ऍपवर बंदी घातलेली आहे. याचे मूळ चीनमध्ये आहे. असे असले तरी हे ऍप निर्माण करणारी बाईट डान्स ही कंपनी भारताबाबत आशावादी आहे. पुढील तीन वर्षांत भारतात बाईट डान्स ही कंपनी एक अब्ज डॉलर म्हणजे जवळपास आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

या कंपनीच्या संचालक हेलेना लर्ष यांनी सांगितले की, आमच्या स्टार्ट अपमध्ये सॉफ्टबॅंक, जनरल अटलांटिक केकेआर, या जगातील मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली आहे. टिक टॉक शिवाय आमचे हॅलो, वीगो व्हिडीओ ऍप जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतात संगणक साक्षरता वाढलेली आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आम्ही आगामी काळातही प्रयत्न करणार आहोत. भारतात टिक टॉकवर बंदी घातली असली तरी आम्ही आगामी काळात भारतीय बाजारपेठेबाबत आशावादी आहोत. त्याचबरोबर भारतात गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या या वर्षाच्या अखेरीस 1000 पर्यंत वाढणार असल्याचे त्या म्हणाल्या.

भारतात टिक टॉकचा वापर 12 कोटी लोकांकडून करण्यात येत होता. त्यात तरुण मुलांचे आणि मुलींचे प्रमाण जास्त होते. मद्रास उच्च न्यायालयाने 3 एप्रिल रोजी केंद्र सरकारला टिक टॉक वर बंदी घालण्याची सूचना केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर गुगल आणि ऍपलने हे ऍप पुरवण्याचे काम थांबविले आहे.

मात्र ज्यांनी हे प अगोदरच डाऊनलोड केलेले आहे ते त्यांचा वापर करू शकणार असल्याचे बोलले जाते यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले भारतातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे सोशल मीडिया साठी भारतातील बाजारपेठ आकर्षणाचे केंद्र आहे त्यामुळे आम्ही भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक करणार आहोत मात्र स्थानिक कायदे आणि संस्कृतीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)