दाऊद इम्ब्राहिम पाकिस्तानातच असल्याचा अमेरिकेचा दावा

नवी दिल्ली – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इम्ब्राहिम हा पाकिस्तानातच लपून बसला असल्याची माहिती एफबीआय या अमेरिकन तपास संस्थेने लंडन येथील न्यायालयाला दिली आहे. दाऊद पाकिस्तानातील कराचीत बसूनच आपले आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क चालवत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

दाऊद इब्राहिमचा सहकारी जाबिर मोतीवालाच्या अमेरिकेतील प्रत्यर्पणाच्या सुनावणी पुर्वी अमेरिकेचे वकील जॉन हार्डी यांनी दाऊद पाकिस्तानात असल्याची माहिती दिली. एफबीआय न्यूयॉर्कमध्ये दाऊदच्या व्यवहारांचा तपास करत असल्याची माहितीही हार्डी यांनी यावेळी दिली आहे.दाऊदने आपले नेटवर्क पाकिस्तान, भारत आणि यूएईमध्ये वाढवले आहे, असेही हार्डी यांनी सांगितले.

गेल्या 10 वर्षांच्या काळात दाऊदने अमेरिकेतही आपले बस्तान बसवायला सुरुवात केली होती. लंडन कोर्टात मोतीवाला याची चौकशी सुरू असून त्याला एफबीआयने 2018 मध्ये ताब्यात घेतले होते. मोतीवाला हा थेट दाऊदच्या संपर्कात होता. मोतीवालाच्या कारवायांची माहिती कोर्टापुढे सादर केल्यानंतर कोर्टाने मोतीवालाला जामीन नाकारला आहे. आता मोतीवालाला एका व्हिडिओ लिंकद्वारे 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.