ड्रोन कॅमेऱ्याद्वारे राजुरी गावाचे सर्वेक्षण

नायगाव- ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्‍चित करून घेण्यासह गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्‍चित करून देण्यासाठी आता भूमि अभिलेख विभागाद्वारे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण केले जात आहे.

पुरंदर तालुक्‍यातील राजुरी गावात ड्रोन कॅमेऱ्या द्वारे गावठाण सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी अमित महाजन, भूमि अभिलेखचे उपअधीक्षक रविंद्र पिसे, नगर भूमापन शिरस्तेदार नितीन वाडकर, एस. पी. भांगरे, एस. व्ही. लवटे, बी. आर. गायकवाड, एस. एम. चिमटे, सरपंच उद्धव भगत, ग्रामसेवक काशीपती सुतार, संभाजी चव्हाण, विठ्ठल चव्हाण, अशोक गायकवाड, कमलाकर भगत, भिमाजी देशमाने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच उद्धव भगत यांनी सांगितले की, हे सर्वेक्षण अतिशय चांगला असून यामुळे जागा निश्‍चित होणार आहेत. यासाठी ग्रामस्थांनी आपआपल्या गावात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)