घरच्या मैदानावर मुंबा बळकट; बंगळुरूकडून चिवट लढत अपेक्षित

यू मुंबा Vs बंगळुरू बुल्स
स्थळ – मुंबई
वेळ – रात्री 8-30 वा.

मुंबई – प्रो कबड्डी स्पर्धेत आज दुसऱ्या सामन्यात यु मुंबा समोर बंगळुरू बुल्सचे आव्हान असणार आहे. एन.एस.सी.आय. क्रीडा संकुलात होणाऱ्या यु मुंबा संघ घरच्या मैदानावर बंगळुरू बुल्सच्या तुलनेत वरचढ मानला जात आहे.

जयपूर पिंकपॅंथर्सविरुद्ध पराभव स्वीकारताना मुंबा संघाला अद्याप अपेक्षेइतका अव्वल दर्जा गाठता आलेला नाही. फाजल अत्राचेली, दोंग गिऑन ली या परदेशी खेळाडूंकडून अपेक्षित चमक पाहावयास मिळालेली नाही. त्याचबरोबर अभिषेकसिंग व रोहित बालियन यांनीही अपेक्षाभंग केला आहे. बंगळुरू संघाविरुद्ध ते आपला अव्वल दर्जा दाखवतील, अशी आशा आहे.

यू मुंबा :

बलस्थाने- घरच्या वातावरणाचा फायदा उत्कृष्ट संघबांधणी
कच्चे दुवे – सांघिक कौशल्याचा अभाव फाजील आत्मविश्‍वासामुळे चुका

बंगळुरू संघाने पहिल्या सामन्यात जयपूर संघाकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारला आहे. त्यांचा भरवशाचा खेळाडू रोहितकुमार याला अद्याप अपेक्षित सूर सापडलेला नाही. त्याच्याबरोबरच लालमोहर यादव व सौरभ नरवाल यांच्यावरही त्यांची मदार आहे.

बंगळुरू बुल्स :

बलस्थाने- खोलवर चढायाबाबत माहीर चांगली संघबांधणी
कच्चे दुवे – शेवटच्या क्षणी आततायीचा खेळ सांघिक खेळाचा अभाव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.