जिल्ह्यातील आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

 जिल्ह्याला दहा नवे अधिकारी; 14 अधिकाऱ्यांना मिळाली मुदतवाढ

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी)

राज्यातील पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले. यामध्ये जिल्ह्यातील आठ अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर जिल्ह्याबाहेरील दहा अधिकारी जिल्ह्यात नव्याने दाखल होणार आहेत. तर 14 अधिकाऱ्यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.

जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात बदली झालेले ठिकाण. अजय हंचाटे (सोलापूर ग्रामीण) शंकर पाटील (सोलापूर ग्रामीण) अनिल कदम (सोलापूर ग्रामीण) सुनिल जाधव (सोलापूर ग्रामीण) भगवान बुरसे (सोलापूर ग्रामीण) बाळू भरणे (पुणे ग्रामीण) विकास जाधव (सोलापूर) स्वप्नील लोखंडे (पुणे ग्रामीण)

तर जिल्ह्याबाहेरून नव्याने हजर होत असलेल्या अधिकाऱ्यांची नावे व कंसात आलेले ठिकाण. चेतन थोरबोले (पुणे ग्रामीण) दत्ता भोसले (पुणे ग्रामीण) मोहन तलवार (पुणे ग्रामीण) सुनिल गोडसे (पुणे ग्रामीण) सुवर्णा हुलवान-पाटोळे (पुणे ग्रामीण) भाऊराव बिराजदार (सोलापूर ग्रामीण) जयश्री पाटील (सांगली) शकुंतला वागलगावे (सांगली) स्वप्नील घोंगडे (सांगली) विकास बडवे (पुणे ग्रामीण) हे अधिकारी नव्याने साताऱ्यात दाखल होत आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×