केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलै पासून

नवी दिल्ली-  पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात 57 सदस्यांना स्थान मिळाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. मात्र, यात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रकाश जावडेकर यांना माहिती आणि प्रसारण, पर्यावरण हे खाते देण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश जावडेकरांची पत्रकार परिषद पार पडली असून, यावेळी त्यांनी ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.