मंचर- जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत आंबेगाव तालुक्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशाने आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होत आल्या असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे सदस्य आणि मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली. जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत निघोटवाडी ते भेकेमळा रस्त्यासाठी 7 लाख 50 हजार रुपये, मंचर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी 5 लाख रुपये, मोरडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी 5 लाख रुपये, गावडेवाडी येथील डोंगरमळा ते पाझरतलाव रस्त्यासाठी 7 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.