मंचर- आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 20वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सेवा दलाचे अध्यक्ष भगवान वाघ यांनी उपस्थितांकडून कवायत करुन घेतली. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ऍड. विष्णु हिंगे, कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, महिला अध्यक्षा सुषमा शिंदे, ज्येष्ठ नेते बाबुराव बांगर यांनी ध्वजाचे पूजन केले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस किसन सैद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, शिरुर लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष सचिन भोर, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, बाजार समितीचे माजी उपसभापती गणपत इंदोरे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब थोरात, बाबासाहेब खालकर, शरद बॅंकेचे संचालक दत्ता थोरात, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष नाथा पाटील घेवडे, बाजार समितीचे संचालक दत्ता हगवणे, सागर थोरात, भीमाशंकर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक शांताराम हिंगे, संचालिका मंदाकिनी हांडे, संजय बाणखेले, शरद शिंदे, मंचर शहर अध्यक्ष राजेंद्र थोरात, निरगुडसर गावचे उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आंबेगाव तालुक्यात पक्षाचे काम नियोजनबद्ध करण्याबाबत उपस्थितांनी शपथ घेतली.