अपहरण केलेल्या मुलीची लवासाजवळील जंगलातून सुटका

सामाजीक सुरक्षा विभागाच्या पथकाने पार केले तीन डोंगर
पुणे,दि.7-प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. यामुलीला लवासा येथील धरणापलीकडच्या छोटयाशा गावात तब्बल तीन महिणे लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांची पथक तीची सुटका करण्यासाठी आले असता आरोपीने तीला डोंगरकपारीतील जंगलात लपवून ठेवले. मात्र सामाजीक सुरक्षा विभागाच्या पथकाने तब्बल तीन डोंगर पार करत मुलीची सुखरुप सुटका केली. अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक करुन चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एका शालेय मुलीला एका 21 वर्षाच्या टपोरी मुलाचे प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. तीला 8 फेब्रुवारी 2019 रोजी राहत्या घरातून पळवून नेण्यात आले. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाताना आरोपीने पोलिसांच्या जाळ्यात सापडू नये यासाठी स्वत:चा मोबाईल फोन बंद ठेवला होता .यामुळे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना अवघड जात होते. या गुन्हयाचा समांतर तपास सामाजीक सुरक्षा विभागाचे पथक करत होते. त्यांना एका छोट्याश्‍या क्‍लू मुळे मुलगी व अपहरण करणारा तरुण लवासा येथील तव या डोंगर कपारीत असलेल्या गावात असल्याची खबर सामाजीक सुरक्षा विभागाला मिळाली. यामुळे सामाजीक सुरक्षा विभागाचे पथक लवासाकडे रवाना झाले. तेथे तव गावी जाण्यासाठी त्यांना धरणातून बोटीने जावे लागते. संबंधीत आरोपीने बोटीतून पोलीस येत असल्याचे पहाताच मुलीला घेऊन डोंगरकपारीत पळ काढला. त्याने पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी तब्बल तीन डोंगर पार केले. मात्र पोलिसांनीही जिकरीने चढाई करत तीन्ही डोंगर पार करुन आरोपीला जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून अपहरण करण्यात आलेल्या मुलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामुळे आरोपीला चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी तरुण हा किरकोळ कामधंदा करतो. तसेच तो टपोरीपणा करण्यात पटाईत आहे. त्याने पंधरा वर्षाच्या मुलीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आई-वडिलांच्या संमंतीविना पळवून नेले होते.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे, पोलीस कर्मचारी रमेश लोहकरे, ननिता येळे, राजेंद्र ननावरे, निलेश पालवे, संदिप गायकवाड, किरण अब्दागिरी यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.