-केदार जाधव खेळण्याची शक्यता कमी
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
वेळ – रा. 7.30 वा
स्थळ – एम. ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
चेन्नई – आयपीएलचा बारावा मोसम समाप्तीकडे आला असून बाद फेरीतील पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांदरम्यान होणार असून अजच्या सामन्यातील विजेत्या संघाला थेत अंतिम फेरीत प्रवेश मिळेल तर दुसऱ्या संघाला एक सामना खेळावा लागणार असून त्या सामन्यातील विजेता संघ आजच्या सामन्यातील संघाबरोबर अंतिम फेरीत मुकाबला करेल.
मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली केली होती. मात्र, मधल्या काही सामन्यांमध्ये दोघांनाही पराभव पत्करावे लागल्याने दोनही संघ थोडे अडखळले. मात्र, अखेर चेन्नईने सर्वप्रथम प्ले ऑफ्स फेरी गाठली. पंजाबविरुद्ध शेवटचा साखळी सामना पराभूत होऊनही चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल होता. पण मुंबईने कोलकाताला नऊ गडी राखून धूळ चारत गुणतालिकेत अग्रक्रम पटकावला.
मुंबईने कोलकात्याला पराभुत केल्याने कोलकाताचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला तर सनरायजर्स हैदराबादचा संघ धाबगतीच्या सरासरीच्या बळावर बाद फेरीत दाखल झाला. यावेळी मुंबईने यंदाच्या मोसमात आपल्या 14 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर पाच सामन्यांमध्ये त्याअंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच साखळी सामन्यांमधील दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने चेन्नईच्या संघाला पराभुत करण्याची किमया साधली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघापेक्षा मुंबईच्या संघाचे पारडे अधीक जड असेल.
तर, दुसरीकडे मुंबईच्या संघा प्रमाणेच चेन्नईच्या संघाने देखील आपल्या चौदा सामन्यंपैकी नऊ सामन्यांमध्ये विजय तर पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करला असून चेन्नईचा संघ बद फेरीत पोहोचणारा सर्वात पहिला संघ ठरला होता. यावेली चेन्नईच्या संघने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी त्यांच्या समोर सर्वात मोठी चिंता ही सलामीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात येणारे अपयश ही आहे. त्यामुळे त्यंना लवकरात लवकर या चिंतेचे निरसन करावे लागणार असून गोलंदाजांना देखील त्यांच्या कामगिरीत सुधारना करणे गरजेचे आहे. कारण, गत सामन्यात पंजाबच्या संघाने चेन्नईच्या सर्व गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत सामन्यात सहज विजय संपादन केला होता. त्यामुळे जर मुंबईच्य संघला पराभुत करायचे असेल तर चेन्नईच्या सलामीवीर आणि गोलंदाजांना आपल्य कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
त्यातच आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या एकूण 26 सामन्यांमध्येही मुंबईच पुढे आहे. या सामन्यांपैकी मुंबईने 15 सामने जिंकले आहेत, तर 11 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय चेन्नईच्या मैदानावर झालेल्या मुंबई चेन्नई सामन्यातही मुंबईने 4-2 अशी आघाडी राखली आहे. आता पहिला प्ले ऑफ्स सामना चेन्नईमध्ये होणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इतिहासाची पुनरावृत्ती करणार की चेन्नई नव्या इतिहासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम, अल्झारी जोसेफ.