टिक-टॉक आणि हॅलो ऍपवर बंदीची शक्‍यता

नवी दिल्ली- चिनी सोशल मीडिया ऍप टिकटॉक आणि हॅलो या ऍप्सच्या वापरावर भारतात बंदी येण्याची शक्‍यता आहे. कारण, या ऍपच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये केली जात असल्याची तक्रारारीवरून सरकारने या ऍपच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. जर या नोटिशीला त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर या ऍप्सच्या वापरावर भारतात बंदी येऊ शकते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित “स्वदेशी जागरण मंच’ या संघटनेने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या ऍपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यापूर्वी मद्रास हायकोर्टाने टीकटॉक ऍपच्या डाऊनलोडिंगवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. तसेच या ऍपमधील व्हिडिओ फेसबूकवर शेअर करण्यावरही बंदी घालण्यास सांगितले होते. त्याचबरोबर लहान मुलांना या ऍप्सपासून दूर ठेवण्यासाठी काही कायदा करता येईल का? याचीही विचारणा केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)