मुंबई- मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी “प्रिया बापट- उमेश कामात” आत एक हलक्याफुलक्या वेब सिरीजमध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘आणि काय हवं?’ असं या वेब सीरिजचं नाव असून, येत्या 16 जुलै रोजी ही सीरीज लाँच होणार आहे. नुकताच या सिरीजचा प्रोमो देखील प्रदर्शित झाला आहे.
दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी या वेब सीरीजचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी आलेल्या ‘टाईमप्लीज’ सिनेमाच्यावेळी ही जोडी एकत्र दिसून आली होती.