बॉलिवुड अभिनेता ऋषि कपूर हे गेल्या एक वर्षापासून न्यूयॉर्क येथे उपचार घेत असून पुढील एक-दोन महिन्यात ते भारतात परतणार आहे. ऋषि कपूरसोबत त्यांची पत्नी नितुसुद्धा आहे. दरम्यान, ऋषि कपूर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संर्पकात असतात. त्यातच नितू कपुरने शाहरुख खानसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात नीतू आणि ऋषिसोबत बॉलिवूडमधील किंग खान दिसत आहे.
शाहरुख खानने नुकतीच ऋषि कपूर यांची न्यूयॉर्क येथे भेट घेतली. तसेच मागील आठवडयातच दीपिका पादुकोण आणि विक्की कौशिल यांनीही त्यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटोही नीतू कपूर यांची पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली होती.
दरम्यान, सप्टेंबर-2018मध्येच उपचारासाठी न्यूयॉर्कला जाण्यापूर्वी ऋषि कपूर यांनी आपले सोशल अकाउंट बंद केले आहे. तसेच माझया आरोग्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केले होते. आता ऋषि कपूर यांची प्रकृती स्थीर असून ते लवकरच मायदेशी परत येणार आहेत.