पर्यावरणप्रेमींचा ‘एचसीएमटीआर’ला विरोध

केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

पुणे – शहरातील वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “एचसीएमटीआर’ अर्थात उच्च क्षमता वर्तुळाकार महामार्ग प्रकल्पामुळे बहुतांश टेकड्या बाधित होणार आहेत. तेथील जैवविविधता संकटात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी या विरोधात कठोर विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

शहराच्या वाहतूक व्यवस्थेला गती देत, त्यामध्ये सुरळीतपणा आणण्यासाठी राज्यसरकारतर्फे “हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिस्ट रूट’ (एचसीएमटीआर) हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहराच्या प्रमुख भागांमधून स्वतंत्र “बीआरटी’मार्गासहित सहापदरी रस्ता करण्याचा हा एक मोठा प्रकल्प आहे.खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकल्पात लक्ष दिले असून, हा प्रकल्प लवकारात लवकर पूर्ण करण्यचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असून, विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी कोणतेही पर्यावरणविषयक संमती घेण्याची आवश्‍यकता नसल्याचे घोषित करण्यात आले आहे.

या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींकडून विरोध करण्यात येत असून, नुकतीच याबाबतीत पर्यावरणप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली होती. सत्या नटराजन, नन्दानी देवी, आनंदवन मित्र मंडळ संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर पर्यावरणप्रेमी हे सर्व या बैठकीला उपस्थित होते. तत्पूर्वी एनाअयबीएम येथील आनंदवन पक्षी अभयारण्य येथे दि.20 आणि 21 जुलै रोजी मानवी साखळी करून विरोध केला जाणार असल्याचे आनंदवन मित्र मंडळतर्फे जसवीर सिंग यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)