कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीने कोल्हापुरात महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. दुष्काळाबाबत महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आज कोल्हापुरात दाखल झाल्या.
यावेळी ताराराणी चौकात घोषणाबाजी करत चंद्रकांत पाटलांना चर्चेला येण्याचे आवाहन महिलांनी केले. कोणी पंटर नाही तर शेतकऱ्यांच्या मुली चर्चेला आल्या आहेत केवळ फेसबुक लाईव्ह वरून पोपटपंची करण्यापेक्षा चर्चेला या, असे प्रतिआव्हान युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले. तर बारामतीत गुलाल लावायला येऊ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना सलगर यांनी तुम्हालाच सुप्रिया सुळेच्या विजयाचा गुलाल लावू असे प्रत्युत्तर दिले आहे.
भरचौकात चर्चा करायला तयार; चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना खुले आव्हान