तोचि खरा निसर्गप्रेमी जाणावा!

सकाळी सकाळी न पाळलेली मांजर येऊन अंगणभर घाण करून ठेवत असेल आणि दार उघडताच त्यात आपला किंवा सकाळी उपटलेल्या आगंतुक पाहुण्याचा पाय भरून ती घाण अंगणभर होत असेल,

पक्षी वेचून आणलेला काडी कचरा घराच्या चहूबाजूंनी टाकून ठेवत असतील,
मुंगुस येऊन हौदावर आपण सहजच जाऊन बसतो त्याच भागात हागून ठेवत असतील,
अनेक घुशी-चिचुन्द्रया आपले अंगण, अंगणातून जाणाऱ्या पाईपलाईन्स म्हणजे त्यांचे खेळाचे आणि नासधूस करायचे मैदान समजत असतील,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

किमान तीन जातीच्या मुंग्या दिसेल तिथे माती उकरून ठेव, कडाडून चाव, घरात देखील ओळीत भोके शोधत बिळे कर असले उद्योग करत असतील,
हजारदा हाकलून देखील किमान चार जातींच्या माश्या-मधमाश्या घरातले लाईट सॉकेट्‌स बुजवून ठेवत असतील आणि घराबाहेर नको तिथे मधाची पोळी करून ठेवत असतील,
दोन मिनिट जरी झाडांमध्ये गेले तरी करोडो डास आपल्यावर हल्ला करत असतील,
विविध प्रकारचे कोळी घर जराही स्वच्छ राहू देत नसतील,
सापसुरळ्या वाटेल तेंव्हा वाटेल तिथे फिरत असतील,

दारातच सरडे आणि कधी घरात, कधी घराबाहेर खेळणाऱ्या तगड्या पाली दिवसातून अनेकदा वात आणत असतील,
रात्रीतून उडणारी वटवाघळे घराचा नव्याने दिलेला रंग प्रसाद शिंपडून खराब करत असतील आणि बागेत लावलेल्या आपल्या गाड्या देखील त्या प्रसादातून सुटत नसतील,
खारी भर दुपारी त्यांचा तो कर्कश्यय आवाज काढून शांतता भंग करत असतील,
नको तेंव्हा गटागटाने उडून येणारे पक्षी डोके उठवत असतील,
विंचू, गोम, पैसे, गोगलगायी आणि ओळखता देखील न येणारे अनेक सजीव आपल्या आसपास राहत असतील,
जरा हात लागला, तर किमान दोन तास खाज सुटेल अशा अळ्या अनेक ठिकाणी लपून वावरत असतील,

नको तेंव्हा मोठाले पतंग घरात उडून येऊन उगाच इकडून तिकडे फडफडत बसून आपल्याला व्यत्यय आणत असतील,
रात्री जरा दार उघडे राहिले, तर शेकडो पावसाळी किडे घरात मोर्चा काढत असतील,
चुकून वाकडा पाय पडला, तर कडाडून चावणारे मुंगळे आसपास असतील,
जरा गेट उघडे राहिले की कुत्रे-गाई-म्हशी आतमध्ये येऊन हैदोस घालून जात असतील,
क्वचित कधी ससे, कोल्हे, मोर आणि माकडे गुपचूप येऊन उद्योग करून गेलेले असतील,
हे कमी की काय, अचानक केंव्हाही नागापासून घोणस-धामणीपर्यंत विषारी/निम विषारी/बिन विषारी साप कुठेही निघत असतील,

तरी जो बंगल्यात राहायचे आणि भोवती मोठी बाग असायचे स्वप्न पाहत राहतो,
तरी ह्यात झाडांचे त्रास टाकलेले नाहीत,
तोचि खरा निसर्गप्रेमी जाणावा!

– प्राची पाठक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)