सत्तेत आल्यास राफेलची कसून चौकशी करू -शरद पवार

बुलडाणा : देशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देणारच तसेच राफेलची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुलडाणा येथील जाहीर सभेत दिले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे संयुक्त महाआघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार म्हणजे देणारच. शिवाय उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव देऊ. आम्ही नुसत्या घोषणा करत नाही.यापुर्वीही कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही म्हणजे नाही असा शब्दही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना दिला.

खा. शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या, मोदींची हुकूमशाही ते चौकीदार चोर है पर्यंतचे अनेक मुद्दे आपल्या भाषणात उपस्थित करत मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

लोकशाहीची चौकट मोडू पाहणार्याो मोदींवर टीकास्त्र सोडतानाच परिवर्तन करण्यासाठी आणि मोदी सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आमदार जोगेंद्र कवाडे, खासदार माजिद मेमन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर, कॉंग्रेसचे नेते मुकुल वासनिक,रमेश बंग, रेखाताई खेडेकर, साहेबरावसत्तार आदींसह मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://twitter.com/NCPspeaks/status/1117729499418808321

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)