काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचा ‘या’ उमेदवाराला पाठिंबा

औरंगाबाद – काँग्रेस पक्षाचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार काँग्रेसवर नाराज झाल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण आता त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अब्दुल सत्तार यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

पत्रकार परिषदेत बोलताना सत्तार म्हणाले की, काँग्रेस हरली आहे, मात्र शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना हरवण्यासाठी आपण हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देत आहोत.

आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. अब्दुल सत्तार यांच्या पाठिब्यांमुळे हर्षवर्धन जाधव यांची ताकद वाढली आहे.

दरम्यान, औरंगबाद येथे आता चौरंगी लढत पहायला मिळाणार आहे. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचे आव्हान असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.