आयएमईआई नंबर बदलल्यानंतरही सापडनार मोबाईल

नवी दिल्ली – ट्रेन किंवा बसच्या प्रवासात फोन चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अनेकदा काही जण पोलिसात या प्रकरणी तक्रार देखील नोंदवतात. पण बऱ्याचदा मोबाइल चोरी झाल्यानंतर त्यांचे सीम आणि आयएमईआई नंबर चोरांकडून बदलला जातो. त्यामुळे तो मोबाइल शोधणे अवघड जाते. मात्र, आता सीम कार्ड किंवा आयएमईआई नंबर बदलला तरीही तुमचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाइल सहजपणे सापडू शकतो. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्‍स (सी-डीओटी) ने एक टेक्‍नोलॉजी तयार केली आहे. जी ऑगस्टमध्ये सुरु केली जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, “सी-डॉट जवळ एक तंत्रज्ञान तयार आहे. दूरसंचार विभागाच्या मंत्र्यांशी ही प्रणाली लागू करण्याबाबत संपर्क केला जाईल. त्यामुळे ही प्रणाली पुढील महिन्यापासून सुरु केली जाईल. दरम्यान, संसदेचे अधिवेशन हे 26 जुलैपर्यंत सुरु असणार आहे. दूरसंचार विभागाने जुलै 2017 मध्ये नकली मोबाइल फोन आणि चोरीच्या घटना कमी करण्यासाठी सी-डॉटला “सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर’ (सीईआयआर) विकसित करण्याचे काम दिले होते. यासाठी सरकारने सीईआयआर गठीत करण्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)