नवी दिल्ली – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. उभय नेत्यांमधील चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरने घेण्याच्या मुद्यावर विस्तृत चर्चा झाली असल्याचे समजते. राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट होय.
Delhi: Maharashtra Navnirman Sena(MNS) Chief Raj Thackeray met UPA Chairperson Sonia Gandhi today pic.twitter.com/k8IpgPAX8u
— ANI (@ANI) July 8, 2019
या दोन नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मनसेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत यावे, असा आग्रह आधीपासूनच राष्ट्रवादीने धरलेला आहे. आता राज यांनी सोनियांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात येत्या विधानसभेला नवी राजकीय जुळवाजुळव पाहायला मिळेल, अशी शक्यता बळावली आहे.