केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा – निवडणूक आयोगाचा आदेश

केंद्रीय मंत्री तथा भाजपचे पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघ देखील लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यामध्ये असल्याने येथे देखील प्रत्यक्ष मतदान सुरु असून मतदानावेळी भाजपचे पश्चिम आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी आपल्या मतदारसंघातील बूथ नंबर १९९मध्ये जबरदस्तीने प्रवेश करत एका निवडणूक प्रतिनिधी व निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिली.

या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला मिळताच निवडणूक आयोगाने तातडीने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1122831873778962433

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)