काँग्रेसची पीछेहाट सुरूच; जम्मूतील काँग्रेस नेत्याचा भाजप प्रवेश

जम्मू – लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाला एक महिना उलटल्यानंतर देखील देशभरामध्ये काँग्रेसची पीछेहाट सुरूच असून आज काँग्रेसला जम्मू-काश्मिरात झटका बसला आहे. जम्मू-काश्मीर येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते मोहम्मद इकबाल मलिक यांनी डझनभर कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मोहम्मद इकबाल मलिक यांनी शनिवारी काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा देताना, काँग्रेस हायकमांड कोम्यात गेलं असल्याची टीका केली होती. यानंतर त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ नारयाची प्रशंसा करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मलिक यांच्यासोबतच त्यांचे समर्थक असणाऱ्या काही सरपंच व पंचानी देखील भाजप सचिव राम माधव यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला.

दरम्यान, जम्मू-काश्मिरातील राजौरी येथील दरहल विधानसभा मतदारसंघामध्ये मोहम्मद इकबाल मलिक हे काँग्रेसचे मोठे नेते मानले जायचे. त्यांनी गेल्या दशकभराच्या काळामध्ये काँग्रेससाठी काम केलं आहे. मात्र यापूर्वी त्यांचा दरहल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकांमध्ये दोनदा पराभव झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)