अमित शाह यांनीच बाहेरून गुंड आणून हिंसाचार घडवला- डेरेक ओब्रेन

पश्चिम बंगाल: कोलकातामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दगळफेक आणि हाणामारीचे प्रकार देखील घडले. यानंतर भाजप आणि तृणमुल काँग्रेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. तसेच तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, तृणमुल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रेन यांनी पत्रकार परिषद घेत. अमित शाह खोटारडे असून त्यांनीच बाहेरून गुंड आणून कोलकात्यात धुडगूस घातली आणि विद्यापीठ परिसरातील ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा पाडला. असा आरोप केला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना ममता बॅनर्जी यांना कोणाचा धाक नसल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1128586319704272896

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)