कर्नाटकनंतर आता ‘या’ राज्यात काँग्रेसला भगदाड; १० आमदार भाजपात सामील

पणजी – कर्नाटकात काँग्रेसच्या १३ आमदारांनी राजीनामा सादर करत कर्नाटकातील जेडीस-काँग्रेस आघाडी सरकार अडचणीत आणल्याची घटना ताजी असतानाच आता काँग्रेसला आणखी एक जोरदार धक्का बसला असून गोव्यातील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवलेकर यांच्यासह काँग्रेसचे १० आमदार आज भाजपमध्ये विलीन झाले आहेत.

याबाबतची अधिकृत घोषणा गोवा विधानपरिषदेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी केली असून चंद्रकांत कवलेकर यांनी देखील भाजपसोबत विलीनीकरणाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चंद्रकांत कवलेकर भाजपसोबत सामील होण्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “भाजपसोबत बैठक झाल्यानंतर आमच्यातील १० आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगले काम करत आहेत. मी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता होतो मात्र तरी देखील माझ्या मतदारसंघात विकास कामे होऊ शकली नाहीत. आम्ही राज्यातील सर्वात मोठा पक्ष असताना देखील केवळ जेष्ठ नेत्यांनी योग्य निर्णय न घेतल्याने आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही आणि त्यामुळेच आम्ही भाजपमध्ये सामील होत आहोत.”

Chandrakant Kavlekar, after merging with BJP: 10 of us entered into BJP today, just because CM is doing a good work. I was Leader of Opposition, despite that development work in our constituency could not be done. Despite being the single largest party we could not form the govt. pic.twitter.com/1JEru0cuUl

— ANI (@ANI) July 10, 2019

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)