वृद्धाचा खून करणारा तीन तासात गजाआड

वडकी येथील घटना; डोक्‍यात दगड घालून झाला होता फरारी

लोणी काळभोर- वडकी (ता. हवेली) येथे बुुुधवारी (दि.17) भरदुपारी वृद्धाच्या डोक्‍यात दगड घालून निर्घुनपणे खून करून एक जण फरारी झाला होता. लोणी काळभोर पोलीसांनी तीन तासांत खुुुन्यास जेरबंद केले. हा खूूून आपण हातउसणे म्हणून घेतलेल्या 100 रूपयाच्या तगाद्यावरून केला असल्याची कबुली आरोपीने पोलीसांना दिली आहे.

चंद्रकांत शंकर चव्हाण (वय 68, रा. पांडवनगर, वडकी, ता. हवेली, पुणे) यांचा खून झाला आहे. या खूनप्रकरणी भिमराव यशवंत खांडे ( वय 48, वडकी, ता. हवेली) यास अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत चव्हाण यांचा मुलगा रमेश चंद्रकांत चव्हाण (वय 40, रा. पांडवनगर, वडकी) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलीसांनी सांगितलेली माहिती अशी की, फिर्यादी रमेश चव्हाण यांचे वडील चंद्रकांत चव्हाण हे बुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ऊरूळी देवाची येथील मंगल कार्यालयात गायकवाड यांच्या लग्नाला जातो, असे सांगून दुचाकीवरून (क्र. एमएच 12 एचएफ 3792) गेले. दुपारी 01:30 वाजण्याच्या सुमारास चव्हाण यांचे शेजारी राहणारे शिवाजी शेवाळे यांनी रमेश यास फोन करून, तुझे वडील वडकी येथील गोडावून समोरील रस्त्यावर पडले असून त्यांच्या डोक्‍यास मार लागला आहे. डोक्‍यातून रक्त येत असल्याचे सांगितले. हे समजताच रमेश तात्काळ पवार मळा येथे पोहोचले. पाहणी केली असता त्यांना वडील चंद्रकांत चव्हाण हे रस्त्यावर उताण्या स्थितीत पडल्याचे आढळून आले. जवळ जाऊन त्यांना हलवले असता काहीच प्रतिसाद न मिळाल्याने वडील मयत झाल्याचे रमेश यांच्या लक्षात आले. तेथे जवळच त्यांची दुचाकी उभी होती. तेथे उभ्या असलेल्या टेम्पो चालकास विचारले असता दुपारी 12:30 पासून तुमचे वडील व एक अनोळखी इसम या दोघांचे भांडण चालले होते, त्यांचीत बराचवेळ झटापटी झाली, त्यानंतर अनोळखी इसमांने खाली पडलेला दगड उचलला व तुमच्या वडीलांच्या डोक्‍यात मारला. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले. हे पाहून तो इसम पटकन निघून गेला, असे सांगितले. सदर माहिती मिळाल्यानंतर रमेश चव्हाण यांनी ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात जाऊन कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणांवरून भांडण करून आपले वडील चंद्रकांत चव्हाण यांचा खून केल्याची तक्रार दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार निलेश राणे, विलास प्रधान, समिर चमनशेख, सागर कडू आदी घटनास्थळी पोहोचले, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आजूूबाजूचा परिसर पिंजून काढला. भिमराव यशवंत खांडे हा वडकी गावच्या हद्दीत घटनास्थळापासून सुुुमारे एक किलोमीटर अंतरावर एका झाडाखाली झोपला होता, त्याच्या डोक्‍यावर जखम व शरीरावर इतर ठिकाणी खरचटल्याच्या खुना होत्या. संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलीसी खाक्‍या दाखवताच त्याने सांगितले की, आपण काही दिवसांपूर्वी चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून 100 रूपये हातउसणे घेतले होते. ते न दिल्याने चव्हाण यांनी तगादा लावला होता. आजही त्यांनी पैशांची मागणी केली होती. याचा राग आल्याने मी त्यांचा डोक्‍यात दगड मारून खून केल्याची कबुली दिली. भिमराव खांडे याला आज शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)